नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

मूल्यशिक्षण

१.       नीटनेटकेपणा       

२.      राष्ट्रभक्ती                 

३.      राष्ट्रीय एकात्मता   

४.      वक्तशीरपणा           

५.     वैज्ञानिक दृष्टिकोन

६.      श्रमप्रतिष्ठा            

७.     संवेदनशीलता       

८.      सर्वधर्म सहिष्णुता

९.      सौजन्यशीलता     

१०.   स्त्री-पुरूष समानता

 शालेय स्तरावर मूल्यशिक्षणाची प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत.
  1. व्यक्ती म्हणून निरोगी आणि निरामय स्वरूपाचे अंतर्बाह्य जीवन जगता येणे.
  2. कुटुंबातील एक घटक म्हणून अन्य व्यक्तींशी आदरयुक्त व जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित होणे.
  3. आपण राहत असलेल्या परिसरातील कलाकृती, निसर्ग, प्राणिमात्र यांचे संरक्षण व त्यांची जोपासना करणे, त्यांच्याबद्दल प्रेम वाढीस लागणे.
  4. सामाजिक बांधिलकी मानणे, समाजऋण मानणे व त्याची परतफेड करण्याचे भान ठेवणे.
  5. स्वतंत्र राष्ट्राचा नागरिक म्हणून राष्ट्रभक्ती अंगी बाणणे. राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्रीय विकास यांसाठी पोषक अशा मूल्यांचा स्वीकार करणे.
  6. मूल्यांचे ज्ञान होणे, योग्य वृत्ती घडणे, दैनंदिन जीवनात मूल्यांची युक्त असे वर्तन विद्यार्थ्यांकडून घडणे यांसाठी पोषक वातावरण, शैक्षणिक उपक्रम यांचे आयोजन करणे.
          वरिल उदिदिष्टे साध्य करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा, शालेय व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्यात एकमत असणे खुपच गरजेचे आहे. या सगळ्या घटकांच्या समन्वयातूनच मूल्यशिक्षणाची उद्दिष्टे गाठली जातील.

 

          भारतीय राज्यघटनेत अनुस्यूत असलेल्या लोकशाही, समाजवादी समाजरचनेचे स्वप्न साकार करण्यासाठी शालेय स्तरावर मूल्यशिक्षणाला पर्याय नाही. शाळकरी वयातच मुलांची जडणघडण या मूल्यांच्या आधारे केल्यास व्यक्तीचे व्यक्तीगत आणि सामाजिक जीवन सुखी होऊ शकेल. बलशाली आणि आनंदी राष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी मूल्यशिक्षण हा पाया मानावा लागेल.
          आपल्या देशाला बाह्य आक्रमणाइतकाच धोका अंतर्गत गोष्टींपासून आहे. आपापसातील वादविवाद, अराजकता, एकमेकांविषयी असूया, द्वेष, बेशिस्त, भ्रष्टाचार, संकुचित मनोवृत्ती, प्रादेशिकता वाद, जातीयवाद, धर्मवाद यांमूळे आपल्या खंडप्राय देशाला धोका आहे. हा धोका टाळून आपणांस पुढे जायचे आहे. राष्ट्राला प्रगतिपथावर न्यायचे असेल, तर आपणांस एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. ‘ विविधतेत एकता ’ हे आपले वैशिष्ट्य आहे. एकविसाव्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाची वेगवान प्रगती पाहिल्यावर तर मूल्यशिक्षणाची आवश्यकता पटतेच.
          राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (१९८६) मूल्यशिक्षणाचे महत्त्व पुढील शब्दांत अधोरेखित करते. " आपल्या सांस्कृतिकदृष्ट्या बहुविध असणा-या समाजात सर्वसामान्य जनतेत ऐक्य व पूर्णत्व येण्यासाठी शिक्षणाने वैश्विक व शाश्वत मूल्यांना उत्तेजन दिले पाहिजे. अशा मूल्यशिक्षणाने सूडवाद, धर्मवेड, हिंसा, लोकभ्रम व दैववाद कमी करण्यास मदत केली पाहिजे."
          यासाठी आपण नीटनेटकेपणा, राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, वक्तशीरपणा, वैज्ञानिक दृष्टिकोन, श्रमप्रतिष्ठा, संवेदनशीलता, सर्वधर्म सहिष्णुता, सौजन्यशीलता, स्त्री-पुरूष समानता या मूल्यांचा स्वीकार केला पाहिजे.
 
          मूल्यशिक्षणाचे औपचारिक व अनौपचारिक हे दोन प्रकार आहेत. मूल्यशिक्षण फक्त वर्गात, चार भिंतींमध्ये किंवा प्रयोगशाळेत शिकण्याची गोष्ट नाही. मूल्यशिक्षण हा विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग करायचा असेल, तर आपणांस खेळांशिवाय दुसरा अतुलनीय पर्याय सापडणार नाही. यासाठी शालेय पातळीवर खालील क्रीडा दिनविशेष महत्त्वाचे आहेत.
  • जागतिक आरोग्य दिन
  • सूर्यनमस्कार दिन
  • कबड्डी दिन
  • राष्ट्रीय क्रीडा दिन
          वरील दिवशी आपण शालेय पातळीवर क्रीडास्पर्धांचे आयोजन करू शकतो. याशिवाय खो-खो, लंगडी, आट्यापाट्या, सुरपारंब्या, कुस्ती, पोहणे स्पर्धा, हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, डॉजबॉल व अशा अनेक खेळांच्या स्पर्धा शालेय पातळीवर घेता येतील. या स्पर्धांमध्ये मुलींचा सहभाग अधिकाधिक वाढवता येईल. विशेष मुलांच्या क्रीडास्पर्धा घेणे, त्यांतून एकमेकांना समजून घेणे, मदत करणे या गोष्टी साधता येतील. खेळांमधून नीटनेटकेपणा, राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, वक्तशीरपणा, वैज्ञानिक दृष्टिकोन, श्रमप्रतिष्ठा, संवेदनशीलता, सर्वधर्म सहिष्णुता, सौजन्यशीलता, स्त्री-पुरूष समानता या गोष्टी साध्य करता येतील.

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा